
विद्यापीठ आणि राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचा उपक्रम
पारोळा (प्रतिनिधी) : येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कै.भाईसाहेब वाय.एस.महाजन व्याख्यानमाला या श्रृंखलेतील पहिले पुष्प प्रमुख डॉ.गुणवनत सोनवणे उपप्राचार्य किसान महाविद्यालय यांनी पर्यावरण संरक्षण अर्थात वसुंधरा रक्षंती रक्षित: या विषयावर व्याख्यान दिले.
कार्यक्रमाचे समन्वयक ॲड.अमोल पाटील व्यवस्थापन परिषद सदस्य, क.ब.चौ.उ.म.वि., प्रमुख अतिथी संचालक भानुदास मोरे , उपप्राचार्य डॉ.एस.बी.भावसार, डॉ.अजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील होते. कार्यक्रमाचे संयोजक डॉ.संजय चव्हाण विद्यार्थी विकास अधिकारी यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.गुणवंत सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना पर्यावरण रक्षणा बरोबर पर्यावरण संवर्धन आवश्यक असून स्वतः पासून सुरवात केली तरच जागतिक तापमान वाढी वर नियंत्रण आणू शकतो त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
ॲड.अमोल पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज ओळखून वृक्ष लागवड, वृक्ष दत्तक घेऊन चळवळ उभी केली पाहिजे असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी रासायनिक खतांचा अती वापर हा येणारी पिढीला आणि सध्या स्थितीत मानवी जीवनात घातक ठरू शकतो म्हणून सेंद्रिय शेती व सेंद्रिय उत्पादनाला चालना मिळाली तर मानवी आरोग्य व्यवस्थित राहिलं असे नमूद केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.अनिल महाले यांनी केले. कार्यक्रमास अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.




