
स्वामी प्रि-प्रायमरी समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये “गोविंदा आला रे आला!” चा जयघोष
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील केऱ्हाळा येथील स्वामी प्रि-प्रायमरी समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शनिवारी जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख जॉन्सी थॉमस यांच्या हस्ते श्रीकृष्ण पुजनाने करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णजन्म, रासलीला, अशा प्रकारे नृत्य सादर केले. संपूर्ण शाळा श्रीकृष्णाच्या गोड लीलांनी आणि उत्साहाने भारावून गेली होती. शाळेच्या मैदानात पारंपारिक पद्धतीने दहीहंडी लावण्यात आली होती. “गोविंदा आला रे आला!” च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी हंडी फोडली.
सुत्रसंचलन भारती महाजन यांनी केले. श्रीकृष्ण जन्माष्टमीचे भाषणं आकांक्षा महल्ले व नंदिनी चौधरी आणि त्यानंतर अध्यक्षीय भाषणं झाले. कार्यक्रमाचे आयोजन वैशाली पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.




