स्वामी एज्युकेशनल ग्रुपमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांच्या लक्षवेधी पथसंचलनाने जिंकले उपस्थितीतांचे मने
रावेर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त स्वामी एज्युकेशनल ग्रुपच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात तिरंगी झेंड्याला मोठ्या उत्साहात, जल्लोषात सलामी दिली. स्वामी एज्युकेशनल ग्रुपच्या सचिव मनीषाताई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून संस्था अध्यक्ष रवींद्र पवार यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी संचालिका डॉ. सुखदा पवार, संचालक पुष्पक पवार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजू पवार, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका कीर्ती कानुगो, स्वामी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. रतिश सर आणि अनिता पाटील, शिरीष कुमार मैराळे प्रामुख्याने उपस्थित होते.
देशभक्तीपर नृत्याचे सादरीकरण, विद्यार्थ्यांचा गौरव
स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्यवीरांना सलामी देण्यासाठी इयत्ता पाचवी सेमीच्या विद्यार्थ्यांनी उपशिक्षक सर्फराज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय लक्षवेधी पथसंचलन केले. त्यात नायक सानिध्य मधुकर पाटील यास संस्था अध्यक्षांनी ५०० रुपायाचे रोख बक्षीस दिले. तसेच रावेर पोलीस स्टेशनतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेली इयत्ता दहावीची दोषीका पाटील हिचा देखील प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर इंग्लिश मेडियम आणि बाल वर्ग सेमी व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी मिशन सिंदूर, डंबेल्स, देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थित प्रमुख अतिथींचे तसेच सर्वांचे मने जिंकून सर्वांच्या मनात देशभक्ती जागृत केली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेच्या सचिव मनीषाताई पवार यांनी देशभक्तीविषयी महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पवार यांनी देशाविषयी तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संचलन आणि नृत्य विषयी गोड कौतुक केले. स्वातंत्र्य दिनाचे ध्वजसंचलन उपशिक्षक विष्णु सरांनी केले तसेच सूत्रसंचलन उपशिक्षक योगेश्वर सरांनी केली. यशस्वीतेसाठी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व विभाग शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




