ऐनपूरच्या पटेल महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन

ऐनपूर (प्रतिनिधी) : ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियान -२०२५ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही. एन. रामटेके, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.पी. उमरीवाड व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पी पाटील, रा.से.यो. चे विभागीय समन्वयक डॉ.जे.पी. नेहेते, डॉ.पी. आर गवळी, डॉ.एन. यु. बारी,प्रा.एच.एम. बाविस्कर विद्यार्थी विकास अधिकारी, एस.बी.महाजन,प्रा.प्रदीप तायडे, प्रा.अक्षय महाजन आदी उपस्थित होते.
या रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी, संस्थेचे संचालक एन. व्ही पाटील, महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. रॅली मध्ये घोषणा देण्यात आल्या. स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवला पाहिजे असे आवाहन करण्यात आले. शेवटी रॅलीचा महविद्यालयात समारोप करण्यात आला.




