
जळगाव (प्रतिनिधी) : चिवास महिला मंडळाच्या वतीने कानळदा (ता. जळगाव) येथील कण्वाश्रम परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत आंबा, नारळ, सिताफळ, आवळा, शमी, रामफळ, बेल अशा अनेक फळझाडांच्या व औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची लागवड करण्यात आली. मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष शांता वाणी यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.
वृक्षारोपण कार्यक्रमात चिवास महिला मंडळाच्या अध्यक्ष वैशाली अकोले यांनी सहभाग घेतला. त्यांच्या सोबत पौर्णिमा पाटील, अर्चना वाणी, वंदना गडे, अर्चना अट्रवलकर, प्रणिता वाणी, मालती वाणी, वैशाली अग्रेसर, अरुणा वाणी, छाया गडे, दर्शना वाणी, उज्वला वाणी या सर्व भगिनींनी वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमास डॉ. महेंद्र काबरा व डॉ. ममता काबरा यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कण्वाश्रमाचे स्वामी अद्वैतानंद महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण रक्षण या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




