जळगावताज्या बातम्याधार्मिकशैक्षणिक

स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल रावेर येथे रक्षाबंधन उत्सव उत्साहात साजरा

रावेर (प्रतिनिधी) : स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर येथे शनिवार रोजी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात व्हॉईस प्रिन्सिपल अनिता पाटील यांनी दीप प्रज्वलन करून केली.

या उत्सवात नर्सरी ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व मुलींनी आपल्या वर्गातील मुलांसाठी सुंदर-सुंदर राख्या आणल्या होत्या, तर मुलांनी त्यांच्या बहिणींना देण्यासाठी चॉकलेट्स, गिफ्ट्स, पेन बॉक्स, कलर बॉक्स, पेन्सिल बॉक्स अशा विविध आकर्षक भेटवस्तू आणल्या होत्या. मुलींनी आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाच्या हातावर राखी बांधली आणि भावांनी त्यांना गिफ्ट्स देत बंधनाचा सन्मान केला. या छोट्याशा भावंडांमधील स्नेहभाव पाहून उपस्थित सर्व शिक्षक व पालक भारावून गेले.

रक्षाबंधनानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर गाणी व नृत्यसादरीकरण करून कार्यक्रम अधिकच रंगतदार बनवला. विद्यार्थ्यांनी विविध थीम्सवर आधारित नृत्यप्रस्तुती सादर केली. या सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना डान्स टीचर युवराज महाजन यांचे कुशल मार्गदर्शन लाभले.

यशस्वीतेसाठी संगीता मॅडम, प्रियंका मॅडम, निशा मॅडम, तेजस्विनी मॅडम, माधवी मॅडम, साक्षी मॅडम, तेजल मॅडम, ज्योती मॅडम, दीपक सर आणि सुनील सर यांनी विशेष परिश्रम घेतले. व्हॉईस प्रिन्सिपल अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि आनंदमय वातावरणात पार पडला.

हा उत्सव विद्यार्थ्यांमध्ये बंधुत्व, प्रेम व आपुलकीचे नवीन बंध निर्माण करणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button