
‘स्वच्छ भारताकडे एक पाऊल’; विद्यार्थ्यांनी शिवमंदिर परिसर केला स्वच्छ
रावेर (प्रतिनिधी) : मॅक्रो व्हिजन अकॅडमी अंतर्गत कार्यरत इको क्लब आणि टुरिझम क्लब यांनी या वर्षभरात एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. ही नावीन्यपूर्ण संकल्पना शाळेचे सेक्रेटरी स्वप्निल पाटील यांनी मांडली आहे. सार्वजनिक मंदिरे आणि त्याभोवती असलेल्या परिसरात साचलेल्या कचऱ्याचे साम्राज्य दूर करण्यासाठी या क्लबमधील विद्यार्थी शिक्षक व मुख्याध्यापक पुढाकार घेत आहेत.
या उपक्रमात गुरुवारी विद्यार्थ्यांनी जीन्सि (शिवमंदिर) या ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम राबवली आहे. यामध्ये त्यांनी केवळ परिसर स्वच्छ केला नाही, तर स्वच्छ व सुंदर भारत या संकल्पनेचा सकारात्मक संदेशही जनतेपर्यंत पोहोचवला आहे. हा उपक्रम वर्षभर राबवण्यात येणार आहे. या कार्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.
स्वच्छता अभियान राबविण्यासाठी आवाहन
मंदिर ट्रस्ट, ग्रामपंचायत, किंवा इतर कोणतीही संस्था किंवा सामाजिक संघटना जर त्यांच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवू इच्छित असतील, तर त्यांनी मॅक्रो व्हिजन अकॅडमीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘स्वच्छता हीच सेवा’ या तत्त्वावर विश्वास ठेवत, शाळेच्या या उपक्रमातून एक नवा आदर्श निर्माण होत आहे. अशा विद्यार्थ्यांमुळे समाजामध्ये स्वच्छतेबद्दल जागरुकता वाढते आणि पुढच्या पिढीकडे एक चांगला संदेश जातो, असे शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व मुख्याध्यापक जनार्दन धनगर यांनी आपले मत व्यक्त केले.
शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक व आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ऍड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर धनराज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.




