
स्वामी प्रि-प्रायमरी अँड समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूल, केऱ्हाळा बु. येथे रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा
रावेर (प्रतिनिधी) : स्वामी प्रि-प्रायमरी अँड समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूल, केऱ्हाळा बु येथे शुक्रवारी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मोठ्या आनंदात या सणात सहभाग घेतला. स्नेह, प्रेम आणि नात्यांची गोडी यांचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण शाळेच्या प्रांगणात अतिशय भावनिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडला.
विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात राख्या बांधल्या आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन बहिण भावा विषयी भाषणात दिली. राखी ही केवळ धागा नसून ती आपुलकी सुरक्षा आणि विश्वास याचे प्रतीक आहे. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि आनंददायी पद्धतीने पार पडला
विद्यार्थ्यांनी आपसात प्रेम, आदर आणि जबाबदारी जाणीव ठेवत सन साजरा केला. रक्षाबंधनासारख्या सणामुळे शाळेत एकतेचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होते हे कार्यक्रमातून स्पष्ट झाले. कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख जॉन्सी थॉमस यांनी केले. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.




