
‘मासिक पाळी स्वच्छता व जनजागृती’ या विषयावर झाले प्रभोधन
रावेर (प्रतिनिधी) : येथील मॅक्रो व्हिजन अकॅडमी येथे ‘मासिक पाळी स्वच्छता व जनजागृती’ या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींना माहिती व उपाय प्रदान करण्याचा हेतू होता.
दरवर्षी २८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. शाळेच्या उपशिक्षिका गायत्री पाटील यांनी इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींना सोबतव शाळेच्या संचालिका वनिता पाटील यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत पारदर्शक व खुल्या समाजातून मिथकांचा पर्दाफाश व निरसन तसेच विद्यार्थिनींसाठी संवादात्मकसत्रे, व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी इच्छुकपणे प्रश्न विचारले आणि स्पर्शातीत वातावरणात चर्चेत भाग घेतला.
नियमित संवाद, जागरूकता व समुचित सुविधा उपलब्ध करून दिल्यास, विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढतो, अभाव पाळी विसरतात व विद्यालयातून अनुपस्थिती कमी होते. शाळांमध्ये स्वच्छतेचे चक्र उभारण्यास मदत होते. म्हणून अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन धनगर यांचा नेहमीच पाठिंबा असतो.
तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजातील पाळी संबंधित चुकीच्या समजुतींचा नाश होतो व आरोग्य, सन्मान, व नैतिक आत्मविश्वास याला चालना मिळते, हेच या उपक्रमाचा उद्देश आहे. अशा उपक्रमांसाठी शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी नेहमीच शाळेला प्रोत्साहन दिले आहे. सामाजिक व सार्वजनिक दृष्टिकोनातून या उपक्रमाचे महत्त्व समजून
शाळेचे उपाध्यक्ष ऍड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर धनराज चौधरी यांनीही या उपक्रमांना दुजोरा दिला आहे.