
जळगाव (प्रतिनिधी) : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे आज जीएनएम् (जनरल नर्सींग मिडवाईफरी) तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावनिक फेअरवेल समारंभातून निरोप देण्यात आला.
तीन वर्षांचा शैक्षणिक व क्लिनिकल अनुभवातून हे विद्यार्थी आता नर्सिंग व्यवसायात परिवर्तनाच्या नव्या वाटेवर प्रस्थान करणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य प्रो. विशाखा गणवीर यांचे हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी विद्यार्थ्यांनी सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि स्वतःला अद्ययावत ठेवण्याचा ध्यास ठेवावा असे सांगत पुढे बोलतांना कार्यक्षेत्रात रुग्णसेवा हा सर्वोच्च ध्यास असावा असेही सांगीतले.
संस्थेचे अध्यक्ष, माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांचा गौरव करत नर्सिंग हा केवळ व्यवसाय नाही, तर मानवतेची खरी सेवा आहे. तुमच्या कार्यातून समाजाला दिलासा व आधार मिळावा, हीच अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयातील संस्मरणीय क्षणांची झलक कथनात सादर केली. यानंतर गायन वादन व नृत्य कला सादर करण्यात आल्यात. प्रथम व व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्मृतीचिन्ह व प्रमाण पत्र देवून या विदयार्थ्यांचा गौरव केला. गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या डॉ. अक्षता पाटील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगितांने करण्यात आला.