जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रयोजनाशासकीयसमस्यासामाजिक
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 75 अर्जांची नोंद

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पबचत भवन, जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमात एकूण ७५ अर्ज प्राप्त झाले.
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, तहसीलदार (संजय गांधी योजनांतर्गत) डॉ.उमा ढेकळे, नायब तहसीलदार राहुल सोनवणे (करमणूक शाखा), इतर शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी विविध प्रश्नांसंदर्भात अर्ज सादर केले असून, त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. प्राप्त अर्जांचा विभागवार आढावा घेऊन कार्यवाहीच्या सूचना दिल्या गेल्या.