केऱ्हाळे बुर्दुक येथे राज्यस्तरीय श्रीमद् भगवद्गीता ज्ञान परीक्षा

२००० परीक्षार्थींची दिली परीक्षा
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील केऱ्हाळे बुर्दुक येथील श्रीदत्त मंदिरात श्रीमद्भगवद्गीता या अध्यात्मिक ग्रंथावर राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा मंदिराचे संचालक भोजराजबाबा लोणारकर यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आली. या परीक्षेत गावातील ३२ महिला, मुली व मुले यांनी सहभाग घेतला.
ही परीक्षा रावेर तालुक्यातील रावेर, ऐनपूर, वाघोदा , विवरा, नांदू पिंप्री , कर्की, निंभोरा आदी अनेक गावातून सुमारे २००० परीक्षार्थींची परीक्षा घेण्यात आली. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, आध्यात्मिक वारसा पुढे चालण्यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
केऱ्हाळे गावातील जास्तीत जास्त महिला वर्गाने परीक्षेमध्ये आपला सहभाग नोंदवत उस्फुर्त प्रतिसाद दिला. स्वामी शाळेचे शिक्षक मिलिंद पाटील यांनी परीक्षक व वैशाली पाटील यांनी केंद्र प्रमुख म्हणून काम पाहिले. यशस्वीतेसाठी सचिन पाटील, साहिल पाटील, भारती महाजन यांनी यांनी सहकार्य केले.