शैक्षणिकआरोग्यजळगाव

डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात मंगळवारी ‘जीसीपी’वर कार्यशाळा

जळगाव (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव यांच्या आयईसी विभागाच्या वतीने क्लिनिकल रिसर्चमधील गुड क्लीनिकल प्रॅक्टिस (जीसीपी) म्हणजेच ‘उत्तम वैद्यकीय सराव किंवा चांगल्या वैद्यकीय पद्धती’चे मूलतत्त्व या विषयावर एक दिवसीय सतत वैद्यकीय शिक्षण सीएमईचे आयोजन करण्यात आले.

ही कार्यशाळा मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी कॉलेजच्या तिसर्या मजल्यावरील डॉ. अक्षता पाटील हॉल येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वा. नोंदणी व दिपप्रज्वलनाने होणार असून ८ सत्रात ही कार्यशाळा होणार आहे.

कार्यशाळेतील विषय व तज्ज्ञ पुढीलप्रमाणे चांगल्या क्लिनिकल प्रॅक्टिसचा परिचय – डॉ. प्रशांत सोळंके आणि डॉ. देवेंद्र आर. चौधरी क्लिनिकल संशोधनातील नीतिमत्ता आणि जबाबदार्या, डॉ. अभिजीत एस. रायते, आयईसीच्या भूमिका आणि जबाबदार्या, डॉ. नीलेश बेंडाळे, प्रस्ताव, आवश्यक दस्तऐवज आणि चाचणी व्यवस्थापन, डॉ. धीरज चौधरी आणि डॉ. बापूराव बिटे, सूचित संमती प्रक्रिया डॉ. अभिजीत एस. रायते, क्लिनिकल चाचण्यांमध्ये देखरेख आणि गुणवत्ता हमी, डॉ. प्रशांत सोळंके आणि डॉ. अनंत बेंडाळे, प्रतिकूल घटना, डॉ. अभिजीत एस. रायते, गट उपक्रम सहभागींनी माहितीपूर्ण संमती मिळवणे आणि प्रतिकूल घटनांचा अहवाल देणे या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा केली जाणार आहे. सायंकाळी या कार्यशाळेचा समारोप केला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button