
रावेर (प्रतिनिधी) : येथील स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल च्यावतीने पाल येथे शनिवारी स्काऊट-गाईड कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांना शिस्त, सहकार्य, स्वावलंबन आणि नेतृत्वगुण यांचा अनुभव यावेळी मिळाला. कॅम्प दरम्यान विद्यार्थ्यांचे मुला-मुलींचे स्वतंत्र गट तयार करण्यात आले होते. प्रत्येक गटाने आपल्या कल्पकतेचा आणि मेहनतीचा परिचय देत विविध स्वादिष्ट पारंपरिक पदार्थ बनवले. खिचडी, पुलाव, शेव भाजी, पोळी, छोले-भटूरे, पनीर भाजी इत्यादी पदार्थांनी कॅम्पचा परिसर खमंग वासांनी भरून गेला.
या उपक्रमात 8(A) वर्गाचा गट विजयी ठरला. त्यांच्या उत्तम नियोजनामागे गटनेते विपुल आणि हर्षाली यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. याशिवाय, शिक्षक वंदना महाजन, जयश्री महाजन, ज्योती चौधरी, हर्षाली मोरे, प्रजापती, बिनसन, राहुल राजेंद्र, राहुल महाजन, समीर खराले यांनी आपल्या गटांसोबत परिश्रम घेतले.
आयोजक मंगेश महाजन व गौरांगिनी कासार यांनी सर्व सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सकाळी शालेय आवारात गाड्यांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. रातिश मौन आणि विभाग प्रमुख अनिता पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना कॅम्पसाठी शुभेच्छा दिल्या.