
जळगाव (प्रतिनिधी) : येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती समारोह कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे उपस्थित होते.
या प्रसंगी उपप्राचार्यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळकांच्या जीवन परिचय करून देत असताना ते एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि पत्रकार असल्याचे सांगितले. तर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपरिचय करत देत असताना जनसाहित्यिक अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध भारतीय लेखक कवी आणि सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगितले तसेच त्यांनी सामाजिक अन्यायावर प्रकाश टाकून समानतेसाठी साहित्यातून खूप मोठे योगदान दिल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. राजेश कोष्टी यांनी केले. कार्यक्रमास डॉ. विनोद नन्नवरे व एन.एस.एस. विभागाच्या विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.