
रावेर (प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात शुक्रवारी असंतोषकाचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे यांनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तसेच वर्षा साठे व मीनाक्षी चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी तेजस सरोदे (तिसरी), कृष्णाल सावकारे (चौथी), आदित्य शिरतुरे (पाचवी) या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून या महान विभूतींच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी शाळेचे उपशिक्षक हितेश टक्के यांनी या महा पुरुषांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका गायत्री गोसावी यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.