आरोग्यआंदोलनजळगाव

आरोग्य अधिकारी डॉ. घोलप यांना बडतर्फ करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने ठिय्या आंदोलन

मनपा आयुक्तांना दिले निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) : मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्याविरोधात अनेक तक्रारी असूनसुद्धा त्यांच्यावर आतापर्यंत महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने गुरुवार, २४ जुलै रोजी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून डॉ. घोलप यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली.

तीव्र आंदोलन छेडण्यात दिला इशारा
डॉ. घोलप यांच्या गैरवर्तवणुकीचे अनेकबाबी उघड झाले आहेत. असे असताना त्यांना मनपा सेवेतून बडतर्फ करण्यात येत नसल्यामुळे शिवसेनेचे कुलभूषण पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने आयुक्त ढेरे यांच्यावर संताप व्यक्त केला. डॉ. घोलप यांच्या गैरवर्तुणीकीबाबतचा चौकशी अहवाल आल्यानंतर सुद्धा कार्यवाही होत नसल्याने शिष्टमंडळाने आयुक्तांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी शिष्टमंडळाने आरोग्य अधिकाऱ्यांना बडतर्फे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्यचा इशारा कुलभूषण पाटील यांनी दिला.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगरसेवक प्रशांत नाईक, आरपीआय आठवले गटाचे महानगरप्रमुख अनिल अडकमोल, युवासेना जिल्हाप्रमुख पीयुष गांधी, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर प्रमुख एजाज मलिक, काँग्रेस पक्षाचे महानगर प्रमुख शाम तायडे, प्रशांत सुरळकर, माजी शहर संघटक राजेंद्र पाटील, प्रमोद घुगे, योगेश चौधरी, विजय राठोड, किरण भावसार, जितू बारी, सचिन चौधरी, योगेश पाटील, लोटण सोनवणे, ज्ञानेश्वर शेकाकुरे, भिमराव पांडव, गुलाब कांबळे, विशाल कोळी, किरण ठाकूर, प्रभाकर कोळी, बापु मेणे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button