जळगावआरोग्यशैक्षणिकसमस्यासामाजिक

संत ज्ञानेश्वर विद्यालयात सुरु होणार ई- कचरा संकलन केंद्र

इको क्लबचा महत्त्वाचा निर्णय

जळगाव (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये ई-कचरा दुष्परिणाम यावर शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मुलांना पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले. शाळेमध्ये लवकरच ई कचरा संकलन केंद्र सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती व इको क्लबच्या बैठकीत घेतलेला आहे. या अभियानाचा उद्देश पर्यावरण संवर्धन आणि ई-कचऱ्याचे व्यवस्थापन याबद्दल जनजागृती केली जाणार आहे.

या अभियानात विद्यार्थ्यांना ई-कचरा म्हणजे काय ते समजण्यासाठी ई – कचरा संकलन केंद्रावर ई – कचरा दिल्यास शाळेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शाळेतील उपशिक्षक निलेश पवार यांच्याकडे ई-कचरा जमा करावा.

शाळेतील विद्यार्थ्यांनी ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून पर्यावरण रक्षण करण्यासाठी आणि शाश्वत व स्वच्छ भविष्य घडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नात सामील व्हावे. ई-कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करता येतील आणि शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल करता येईल. ई -कचरा संकलन अभियानात सहभागी व्हा आणि जबाबदारीने कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन संस्थाचालक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी शाळेतील विद्यार्थी व पालक यांना केले. सर्व ई-कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नोंदणीकृत केलेल्या रिसायकलिंग केंद्रांकडे सोपवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button