
आमदार सत्यजित तांबे पाटील यांच्याकडून ‘अभिनंदन पत्र’
रावेर (प्रतिनिधी) : येथील मॅक्रो व्हिजन अकॅडमीची विद्यार्थिनी अनुष्का पाटील हिने नुकत्याच झालेल्या वैद्यकीय शाखा राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (NEET) नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्याबद्दल तिचे नाशिक पदवीधर मतदार संघ आमदार सत्यजित तांबे पाटील यांनी तिला ‘अभिनंदन पत्र’ पाठवून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी देशातील सर्वात मोठी परीक्षा असलेल्या NEET 2025 च्या निकाल यादीनुसार अनुष्का पाटील AIR (ALL INDIA RANK) 5863 असून OBC RANK 2344 संपादन केले आहे. या विद्यार्थिनीने MBBS मध्ये 99.72 PERCENTILE सह घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच बारावीत तिने 92 टक्के गुण मिळवत विक्रमी यश संपादन केले होते.अनुष्का ही दिपनगर येथील (MSEB) अतिरिक्त कार्यकारी अभियंता जे. पी. पाटील यांची कन्या आहे.
आपली जिद्द, ज्ञान, कौशल्य व क्षमतेमुळे अनुष्काचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच या विद्यार्थिनीला सत्यजित तांबे पाटील (आमदार, नाशिक पदवीधर मतदार संघ) यांनी वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी संवेदनशील व कर्तव्यनिष्ठ डॉक्टर म्हणून समाजसेवेचे महान कार्य तिच्या हातून पार पाडावे, ही सदिच्छा व्यक्त केली आहे. आणि तिच्या भावी आयुष्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
आमदार तांबे यांनी वैयक्तिकरित्या विद्यार्थिनीच्या यशाची दखल घेतली आहे. ही शाळेसाठी खूप अभिमानाची बाब असून याबाबद्दल शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील, जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी त्यांचे मानले आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ऍड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर धनराज चौधरी, व्यवस्थापक किरण दुबे, शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन धनगर (धनके) यांच्यासह शाळेचे शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग यांनीही गुणवंत विद्यार्थिनीला शुभेच्छा दिल्या आहेत.