
मॅक्रो व्हिजन अकॅडमीमध्ये ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ संकल्पनेवर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रम
रावेर (प्रतिनिधी) : मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर येथे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी टुरिझम या विषयाअंतर्गत ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ या संकल्पनेवर आधारित एक अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वेस्टेज अर्थात सुकलेल्या व वापरून टाकलेल्या फुलांचा पुनर्वापर करत, त्यांच्यापासून सर्जनशीलतेने सुंदर बीज (कलाकृती) तयार केली. उरलेल्या फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग त्यांनी कंपोस्ट खत करण्यासाठी केला व एक प्रकारे रोगराईला आळा घालण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि कचऱ्यातूनही सुंदर व उपयोगी वस्तू तयार करता येतात, हे दाखवून देणे हा होता. विशेष म्हणजे, या फुलांपासून विद्यार्थ्यांनी नवीन फुलांचे रोप तयार करण्यासाठी लागवडही केली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व पर्यावरण संरक्षणाच्या जाणिवेला चालना देणारा ठरला. ही नावीन्यपूर्ण संकल्पना शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे यांनी विद्यार्थ्यांकडून अमलात आणली. शाळेचे प्राचार्य व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना अशाच प्रकारच्या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.