
तालुका युवा सेनेच्यावतीने भाविकांना लाडू वाटप
जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर तालुका युवा सेना, शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त शहरातील सोनबर्डी येथील महादेव मंदिर येथे महाआरती करण्यात आली. तसेच उपस्थित भाविकांना प्रसाद रुपी म्हणून लाडू वाटप करण्यात आले.
जामनेर तालुक्यातील बळीराजाला यावर्षी भरभरून उत्पन्न मिळू दे. तसेच जामनेर तालुक्यातील विकास अधिक जोमाने होऊ दे, अशी महादेव चरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक कैलास माळी, शहर प्रमुख नरेंद्र धुमाळ, युवा सेनेचे विशाल लामखेडे, चेतन माळी, प्रशांत बराट, दिग्विजय पाटील, गोलू कदम यांच्यासह मोठ्या संख्येने युवा सैनिक उपस्थित होते.