स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात कृषी दिन उत्साहात

रावेर ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी दिन दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर येथे कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगलमय आणि निसर्गमय कार्यक्रमाची सुरुवात स्व. वसंतराव नाईक, माता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजन करून झाले. स्वर्गवासी वसंतराव नाईक यांच्या जीवनावर शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष रवींद्र पवार सर यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रावेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांनी अध्यक्षपद भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून संगीता पाटील शिक्षण विस्तार अधिकारी रावेर, अजय बावणे वन अधिकारी रावेर, मेश्राम मॅडम, दीपक मराठे विषय साधन व्यक्ती रावेर, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पवार सर, सचिव मनीषा पवार मॅडम माध्य.विभाग मुख्याध्यापक राजू पवार प्राथ.विभाग मुख्याध्यापिका धांडे मॅडम पर्यवेक्षिका कीर्ती निळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात शाळेचे उपशिक्षक विलास महाजन यांनी स्वर्गवासी वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रातील अनेक प्रसंगांचा उलगडा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार कोळी तर आभार प्रदर्शन रुपेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.