जळगावयोजनाशासकीयशेतकरीशैक्षणिकसामाजिक

गावाचा सर्वांगीण विकास हा ग्रामीण प्रगतीचा पाया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळके व विटनेरमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन

जळगाव (प्रतिनिधी) : गावांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि सांस्कृतिक प्रगती हेच ग्रामीण भागाच्या खऱ्या अर्थाने प्रगतीचे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

तालुक्यातील जळके व विटनेर येथे आयोजित कार्यक्रमात विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते पार पडले. जळके येथील वसंतवाडी गावाजवळ ₹६० लक्ष निधीतून बांधलेल्या लोकल नाल्यावर संरक्षक भिंतीचे, जिल्हा परिषद शाळेच्या ₹११.५० लक्ष निधीतून बांधलेल्या इमारतीचे, तसेच महादेव मंदिर परिसरात ₹१० लक्ष निधीतून साकारलेल्या पेव्हिंग ब्लॉक व सुशोभीकरण कामांचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर विटनेर येथील जिल्हा परिषद शाळेच्या ₹११.५० लक्ष निधीतून उभारल्या जाणाऱ्या नवीन इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.

या कार्यक्रमात कामगार महिलांना भांडी संच व शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “गावच्या मातीशी माझे भावनिक नाते आहे. गावात मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेसह दर्जेदार शिक्षण पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, गरजेनुसार निधी कमी पडू दिला जाणार नाही. आज फक्त इमारतींचे नव्हे, तर नव्या आशा-स्वप्नांचे लोकार्पण होत आहे. महिलांना दिलेले भांडी संच त्यांच्या कष्टमय जीवनात थोडी मदत ठरेल आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या वह्या शिक्षणासाठी प्रेरणा देतील.”

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी जिल्हा परिषद माजी सदस्य पवन सोनवणे, उपजिल्हा प्रमुख रवी कापडणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, माजी उपसभापती साहेबराव वराडे, सरपंच स्नेहा साठे, माजी सरपंच नितीन जैन, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील, उपसरपंच सोपान सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक पाटील, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, विटनेर ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ जाधव, योगेश गुंजाळ, सुरेश गोलांडे, सागर परदेशी, राजू परदेशी, श्यामसिंग परदेशी, भूषण पाटील, सरपंच राजूभैय्या पाटील, उपसरपंच सुशीलाबाई पाटील, कवीश्वर पाटील, सागर दिवाणे, नारायण पाटील, सुभाषवाडी सरपंच राजाराम राठोड, लोणवाडी सरपंच बाळू धाडी, वराड उपसरपंच राजू जाधव, अर्जुन पाटील, सचिन पाटील, जितेंद्र पाटील, संदीप सुरळकर, रामकृष्ण काटोले, मागासवर्गीय सेना तालुका उपाध्यक्ष सुनील ब्राम्हणे, महिला तालुका अध्यक्षा अनिता चिमणकरे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन पी. के. पाटील यांनी तर प्रास्ताविक दूध संघाचे संचालक रमेश पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन सरपंच स्नेहा साठे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button