
शिरपूर (प्रतिनिधी) : किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ.विजयराव व्ही.रंधे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी सीमा सुरक्षा दलाचे जवान शिरीष भामरे, शिरीष माळी डॉ. विजयराव व्हि.रंधे. शाळेचे समन्वयक जी.व्हि. पाटील हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यावेळी शिरीष माळी, भामरे यांनी कारगिल विजयाची थरारक कहानी मुलांसमोर कथन केली. तर जी.व्हि. पाटील यांनी मुलांना उद्देशून तुम्हीच देशाचे भविष्य आहात व तुम्ही शिक्षक व आई-वडील यांचं आज्ञेत राहून देश सेवा करा, असा संदेश दिला. याप्रसंगी शहीद जवानांना देश सेवेची प्रतिज्ञा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी इयत्ता माध्यमिक विभाचे कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कामगिरीवर नाटिका सादर केली. तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनि देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले.
शाळेच्या प्राचार्य सारिका ततार यांनी शिरीष भामरे यांचा परिचय करून दिला तर शितल पाटील यांनी कारगिल विजय दिवसाची माहिती दिली. यावेळी देवयानी माळी, कन्हैया कोळी यांनी देशभक्ती वर गीत गायले. प्राचार्य कामिनी पाटील, प्रमोद पाटील, रमाकांती विश्वकर्मा, मनीषा लोखंडे, समाधान राजपूत, रीडवाण शेख मनीषा पटेल उपस्थित होते. सूत्रसंचालन निलोफर शेख, प्रेरणा खैरनार यांनी केले. यशस्वीतेसाठी वंदना पाटकरी, गायत्री शिंदे व चौधरी, गायत्री पाटील यांनी परिश्रम घेतले. आभार अश्विनी पटेल यांनी मानले.