श्रीराम रथउत्सवामध्ये मंगळसुत्र चोरणारे अट्टल गुन्हेगार महिला जेलबंद!

जळगाव शहर पोलीस गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगीरी
जळगाव (प्रतिनिधी) : श्रीराम रथउत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेत मंगळसुत्र चोरणाऱ्या महिला तोटीला शहर पोलिसांनी जेलबंद केले. त्या महिलांकडून सुमारे 40,000 रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात रविवारी रथ उत्सवाचा कार्यक्रम चालू असतांना संध्याकाळी ६ ते ८ वाजेच्यादरम्यान दाणाबाजार परीसरातील अन्नदाता हनुमान मंदीराजवळ गर्दीचा फायदा घेत यातील काही महिलांच्या अंगावरील सुमारे 77,500/- रुपायाचे सोन्याचे मंगळसुत्रातील वाटया व मंनी महिला आरोपीतांनी तांडल्याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होते.
यांनी केली कारवाई
या महिलांच्या तक्रारी प्राप्त होताच पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेको नंदलाल पाटील, बिरेंद्र शिंदे, भगवान पाटील, उमेश भांडारकर, सतिश पाटील, योगेश पाटील, पोर्को भगवान मोरे, अमोल ठाकुर, प्रणय पवार, मपोकों हर्षदा सोनवणे, जयश्री मराठे, मोनाली राजपुत यांच्या दोन टीम तयार करुन त्यांनी श्रीराम रथउत्सवाचा कार्यक्रमामध्ये दाणाबाजार येथे रवाना केले. या पथकाने काही संशयीत महिलांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन सोन्याचे मंगळसुत्राच्या वाट्या व मनी मिळुन आले.
सोन्याचे वस्तू जप्त
- रु.12000/- एक सोन्याच्या मंगळसुत्राच्या 02 वाट्या त्यांचे वजन 1.870 ग्रॅम जुवाकिंअं
- रु. 4000/- रु कि चे 04नग सोन्याचे मनी वजन 0.680 ग्रॅम जुवाकिंअं
- रु.9000/- रु कि चे 01 नग मंगळसुत्रातीत सोन्याची वाटी वजन 1.460 ग्रॅम जुवाकिअं.
- रु.9000/- रु किंचे 01 नग मंगळसुत्रातीत मध्यम आकाराची सोन्याची वाटी वजन 1.460 ग्रॅम जुवाकिंअं.
- रु.6000/- रु कि चे 01 नग मंगळसुत्रातीत लहान आकाराची सोन्याची वाटी वजन 0.950 ग्रॅम जुवाकिंअं.
- अशा एकूण रु.40,000/- चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.




