
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संघटनांचा महासंघ, जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ आणि मु. जे. महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धांचे अद्ययावत नियम शिबिर उत्साहात झाले.
मु. जे. महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संघटना महासंघाचे अध्यक्ष आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते खाशाबा जाधव व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून झाले.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद राणे, उपप्राचार्य प्रा. आर.बी. ठाकरे, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जिल्हा क्रीडा संघटना महासंघाचे सचिव डॉ. प्रदीप तळवलकर, जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव, विभागीय क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे, मनभावन रेडिओचे अमोल देशमुख, ग. स. सोसायटीचे संचालक मुख्याध्यापक मंगेश भोईटे, तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन आरजे शुभांगी बडगुजर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी करून शिबिराच्या उद्दिष्टांवर सविस्तर भाष्य केले. उपस्थितांचे स्वागत क्रीडा अधिकारी सचिन निकम व डॉ. सुरेश थुरकडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, चंचल माळी, मिनल थोरात आणि डॉ. रणजित पाटील यांनी केले.
यांनी केले मार्गदर्शन
शिबिरामध्ये विषयतज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. वसीम मिर्झा (ॲथलेटिक्स), जयांशु पोळ (खो-खो), प्रविण ठाकरे (बुद्धिबळ), संजय पाटील (कुस्ती), डॉ. देवेंद्र सोनार (मेडिटेशन), राज्य मार्गदर्शक चंचल माळी (योगा), प्रशांत कोल्हे (कबड्डी) यांनी मार्गदर्शन केले. तसेच नाशिकच्या के. टी.एच.एम. महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका डॉ. मीनाक्षी गवळी यांनीही योग विषयक मार्गदर्शन केले.
३०० क्रीडा शिक्षकांनी उपस्थिती
शिबिरास जिल्ह्यातील सुमारे ३०० क्रीडा शिक्षकांनी उपस्थिती लावली. समारोप जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. सहभागी शिक्षकांसाठी चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मु. जे. महाविद्यालय व एकलव्य क्रीडा संकुल यांचे विशेष सहकार्य लाभले.