
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील ऐनपूर येथील स्वामी अकॅडमी शाळेत बुधवारी लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक मनु अँटोनी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी रुपाली महाजन, शारदा कोंडे, निलेश महाजन, अनिकेत महाजन यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पाचवीतील नैतिक महाजन, गौरव पाटील, किर्तीका चौधरी व चौथीतील पियूष पाटील, प्रणव पाटील, मानव महाजन या विध्यार्थानी भाषणे सादर केली. मनु अँटोनी यांनी अध्यक्षीय भाषणात विचार व्यक्त केले.
सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी तर आभार निलेश महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी आशा लोहार, पल्लवी महाजन, नेहा पाटील, अनुपमा पाटील, निकिता राणे व शिपाई मदतनीस आशा सोनार, लक्ष्मी चौधरी यांनी परिश्रम घेतले.