आर्थिकक्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशासकीय

अवैध गांजा वाहतूक करणारे दोघे जेरबंद

८ किलो गांजा जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : सत्रासेन ते चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या दुचाकीवरील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ८ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास माहिती मिळाली की, सत्रासेन ते चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर दोन इसम मोटार सायकलवर गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक करत आहे. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच अंमलदार तसेच चोपडा ग्रामीण पो.स्ट प्रभारी अधिकारी पो.नि. मधुकर साळवे व अंमलदार यांनी एकत्रीत येवुन वाहनाची तपासणी केली असता अवैध गांजा वाहतुक करणा-या मोटार सायकलवरील अविनाश साहेबराव ढिवरे (वय-२६ रा-खोकरी पो.स्ट धवली, ता-वरला, जिल्हा बडवाणी) व रोशन साहेबराव ढिवरे (वय-३१ रा-खोकरी, पो.स्ट धवली, ता.वरला, जिल्हा बडवाणी) या दोघांना ताब्यात घेतले.

२,२८,६४० रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
त्यांच्याकडून १,७८,६४० रु.किमतीचा ८ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा, ४०,००० रु.किमतीची एक होन्डा कंपणीची मोटार सायकल (क्रमांक MP-४६-MV-२९५१), १०,००० रु.किमतीचा एक मोबाईल फोन असा एकूण २,२८,६४० रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याविरुध्द चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव परीमंडळ श्रीमती कविता नेरकर, अण्णासाहेब घोलप, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग, राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्था.गु.शा जळगांव मधुकर साळवे चोपडा शहर पो.स्टे चार्ज चोपडा ग्रामिण पो.स्टे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई स.पो.नि शेषराव नितनवरे नेम-चोपडा ग्रामिण पो.स्टे व पोउ.निरी. जितेंद्र वल्टे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पोह. विलेश सोनवणे, पोकॉ. रावसाहेब पाटील, सर्व नेमणुक. स्था.गु.शा जळगांव तसेच चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोह. राकेश पाटील, पो.कॉ. मनेष गावीत, पोकॉ. प्रमोद पवार, पोकॉ. तिरुपती खांडेकर, पोकॉ किरण पारधी यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button