
ऐनपूर ता.रावेर (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात पर्यावरण संवर्धन अंतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडी संदर्भात विविध घोषणा देऊन जनजागृती केली. संस्थेचे संचालक एन.व्ही.पाटील, शाळेचे व्यवस्थापक आर.टी.महाजन, मुख्याध्यापक अक्षय पाटील यांच्याहस्ते शालेय परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे एकूण ५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.
सर्व विद्यार्थ्यांनी सजीवसृष्टीबाबत झाडांचे महत्व लक्षात घेता झाडांचे संगोपन करण्याचे एन.व्ही.पाटील यांनी विद्यार्थांना आवाहन केले. विद्यार्थ्यांनी देखील वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचे ठरविले. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने शाळेचा परिसर हिरवगार करण्याचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी निकिता चौधरी, कल्याणी शिंदे, शिवम चौधरी, किरण चौधरी व कृषीदूत गौरव महालकर,सौरव महेर, पियुष नेहते, पुष्पराज शेळके, कुणाल सपकाळे, हर्षल पाटील, आयुष चौधरी, उमेश सोनवणे, अनिकेत पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनीसुद्धा वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग नोंदविला.