
रावेर (प्रतिनिधी) : स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष डान्स टीचर युवराज महाजन यांची नेमणूक करण्यात आली आहे. या विशेष उपक्रमाचा शुभारंभ संस्थेच्या संचालिका डॉ. सुखदा पवार, प्राचार्य डॉ. रातिश मौन आणि अनिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन व गणेश पूजनाने करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक तसेच आधुनिक नृत्यशैलींचे प्रशिक्षण मिळणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागणार आहे.
शाळेतील वातावरणात कलात्मकतेचा नवा रंग भरला गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे.




