कलाकारशैक्षणिक

रावेरच्या स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘बॅग फ्री डे’ उत्साहात साजरा

दप्तरच्या ओझ्याविना विद्यार्थ्यांनी घेतला मनमुराद आनंद

रावेर (प्रतिनिधी) : स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल येथे १९ जुलै रोजी “बॅग फ्री डे” उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी नर्सरी ते दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी पाठीवरील बॅग बाजूला ठेवत शाळेत हसतमुखाने हजेरी लावली. पुस्तकांच्या ओझ्याविना, वेगवेगळ्या शैक्षणिक व मनोरंजक उपक्रमांमध्ये सहभागी होत मुलांनी हा दिवस संस्मरणीय केला.

या दिवशी शाळेत आनंददायी वाचन सत्र, सृजनशील व बौद्धिक खेळ, संवाद व सादरीकरण कौशल्य वाढवणारे उपक्रम तसेच मेंदूला चालना देणाऱ्या रंजक क्रियांचा समावेश करण्यात आला होता. “खेळत खेळत शिक्षण” या संकल्पनेला अनुसरून ‘आनंददायी खेळू चला’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खास राबवण्यात आला.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत विविध क्रियाकलांचा मनमुराद आनंद घेतला. गोष्टी ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य, रचनात्मक खेळांमधील कल्पकता आणि सादरीकरणातल्या आत्मविश्वासामुळे या उपक्रमांची यशस्वीता अधोरेखित झाली.

उपक्रमांचे यश हे संस्थाध्यक्ष रवींद्र पवार व मनीषा पवार यांच्या प्रेरणादायी कौतुकाने अधिक गगनावर गेले. शाळेच्या प्रमुख अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व आनंदमय वातावरणात पार पडला. शाळेतील सर्व शिक्षकांनी समर्पणभावाने जबाबदाऱ्या पार पाडत नियोजन आणि अंमलबजावणी केली.

या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि बौद्धिक कौशल्यांना चालना मिळाली असून, पालकांनीही या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button