
विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मुलांना राणभाज्यां विषयी समजावे व पावसाळ्यात आपल्या आजूबाजूच्या परिसरात रुजून येणाऱ्या रानटी भाज्यांची माहिती मिळावी म्हणून मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत परिसरातील रानभाज्यांची माहिती देत त्यांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहारात तसेच पोषण आहारात यांचा समावेश असावा असे आवाहन शाळेतील उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी केले पालक वर्गाला केले.
विविध आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारामध्ये रानभाज्यांचे महत्त्व याबाबतचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. मुलांना पुस्तकामध्ये अडकवुन न ठेवता विद्यार्थांना बाकीच्या गोष्टींचे ज्ञान देणे ही गरजे आहे. ज्ञाना बरोबर व्यवहारातील गोष्टी शिकवणे, तसेच शेतीची व रोजगाराची माहिती देणे व Practicals ही करुन घेणे तिचकेच महत्तवाचे. मुलांना हे लहाणपणीच कळले तर गावही समृध्द होतील व गावातही रोजगार निर्मीती होईल. कार्यक्रमाला सर्व पालक शिक्षक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.