योजनाजळगावशासकीय

केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) तात्काळ सादर करावे, असे आवाहन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना यांसारख्या केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की, त्यांनी आपले डिजिटल हयात प्रमाणपत्र (DLC) तयार करून संबंधित पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाने ‘बेनिफिशियरी सत्यापन अ‍ॅप (Beneficiary Satyapan App)’ विकसित केले असून ते Google Play Store वर अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलसाठी उपलब्ध आहे.

असे तयार करा हयात प्रमाणपत्र
१. ‘आधार फेसआरडी’ (Aadhaar FaceRD)अ‍ॅप Google Play Store वरून डाउनलोड करा.
२. ‘बेनिफिशियरी सत्यापन’ (Beneficiary Satyapan) अ‍ॅप डाउनलोड करून डिव्हाइस नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
३. लाभार्थ्याने आधार क्रमांक, मोबाईल नंबर व OTP च्या माध्यमातून चेहरा, बोटांचे ठसे किंवा डोळ्यांची पडताळणी करून हयात प्रमाणपत्र तयार करावे.
४. प्रमाणपत्र यशस्वीरित्या तयार झाल्यावर NSPT पोर्टलवर आपोआप अपलोड होईल व SMS द्वारे पुष्टी मिळेल. लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून आपले हयात प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दिव्यांग बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्य मदतीत १ हजार रुपयांची वाढ
राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून दिव्यांगांसाठी दिले जाणारे अनुदान १५००/- रुपये वरून २५००/- रुपये वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्ती वेतन योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अधिक मदत मिळणार आहे.अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी आज विधिमंडळात दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button