
ऐनपूर, ता.रावेर (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषीदूतांनी ऐनपूर गावात उपयुक्त कीटकांविषयी शेतकऱ्यांना आणि गावातील नागरिकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शेतीसाठी फायदेशीर असलेल्या कीटकांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कीटकांचे फायदे, त्यांचे प्रकार आणि त्यांचा उपयोग याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, प्रा. बी. एम. गोणशेटवाड, प्रा. व्ही. एस. पाटील तसेच विषयशिक्षक प्रा. ए. आर. सुहानी आणि प्रा. एस. एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या उपक्रमात कृषीदूत गौरव महालकर, सौरव महेर, पियुष नेहते, कुणाल सपकाळे, पुष्पराज शेळके यांनी सहभाग घेतला. ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण केली.