
ऐनपूर, ता.रावेर (प्रतिनिधी) : सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर येथे १८ जुलै रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक अक्षय पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी शाळेचे व्यवस्थापक आर.टी.महाजन, उपशिक्षक शिवम चौधरी, उपशिक्षिका ममता पाटील, जागृती पाटील, चंदा महाजन यांच्यासह कृषीदूत गौरव महालकर, सौरव महेर, पियूष नेहते, कुणाल सपकाळे व पुष्पराज शेळके आदी उपस्थित होते. यावेळी अण्णाभाऊ साठे यांचा जीवन अधोरेखित करण्यात आला. तसेच प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक बी.एम.गोंणशेटवाढ व कार्यक्रम अधिकारी प्रा.वी.एस.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.