ताज्या बातम्या

भुसावळ बस स्थानकात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राची सुरुवात

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या माध्यमातून भुसावळ बस (एस टी) स्थानक परिसरात निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राची सुरुवात उदघाटन करण्यात आली.बसस्थानक परिसरात दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी येत असतात. त्यांना तसेच बस आगारातील कर्मचाऱ्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या साठी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयातर्फे निःशुल्क ओपीडी सेवा केंद्राचे सोमवार दिनांक ३० जून रोजी उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ केतकी पाटील, जळगाव जिल्हा महामंडळ परिवहन विभागाचे नियंत्रक भगवान जगनोर, भुसावळ स्थानक नियंत्रक शिवदे यांच्याहस्ते फित कापून उदघाटन झाले. लगेचच प्रवाशांची तपासणी झाली.

या वेळी डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्वीकर, अधिष्ठाता डॉ प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रेमचंद पंडित, डॉ. सुभाष बडगुजर, जीआयएमआरचे संचालक डॉ प्रशांत वारके, भुसावळ येथील डॉ उल्हास पाटील स्कूलच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील, सन ऍड ऍडव्हर्टाइजचे मंगेश दादा जुनागडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी आरोग्य कक्षाची पाहून करून समाधान व्यक्त केले. सदरचा उपक्रम हा महामंडळाच्या प्रवाशांसाठी खूप उपयुक्त असा ठरणार असून या माध्यमातून प्रवाशांना विविध आजारांवर मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत त्याबद्दल गोदावरी फाउंडेशन चे आभार मानले.

याप्रसंगी बोलताना गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ केतकीताई पाटील यांनी या आरोग्य कक्षाच्या माध्यमातून प्रवाशांना अधिकाधिक चांगली वैद्यकीय सेवा देण्याचा मानस राहील अशी ग्वाही दिली. केवळ प्रवासीच नाही तर बस आगारातील कर्मचारी, परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करून दिली असून सर्व प्राथमिक उपचार येथे केल्या जातील. तसेच अधिक वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास पुढील उपचार डॉ उल्हास पाटील रुग्णालयात केले जाणार आहे. या प्रकारचा उपक्रम लवकरच जळगाव बस स्थानकावर देखील सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ केतकी पाटील म्हणाल्या.

यावेळी १५ रुग्णांनी या सेवेचा तासाभरातच लाभ घेतला. तसेच आम्हा प्रवाशांसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून दिल्याने प्रवाशी वर्गामध्ये समाधान दिसून आले. या प्रसंगी गोदावरी नर्सिंग कॉलेजचे इन्चार्ज आकाश धनगर, इंटेरियरचे रामपाल जांगिड तसेच गोदावरी फाउंडेशन चे प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. पंकज बोंडे, रितेश पाटील यांच्यासह महामंडळातील कर्मचारी व मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button