
जळगाव (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाचे औचित्य साधून खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विधी सेवा शिबिराचे आयोजन प्रामुख्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेले होते.
ज्यामध्ये ऍड. शिल्पा रावेरकर, सहाय्यक लोक अभिरक्षक आणि मंजुळा मुंदडा, उपमुख्य लोक अभिरक्षक तसेच प्रमुख मार्गदर्शक पवन एच. बनसोड, सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण उपस्थित होते. सुरुवातीला स्कूलच्या उपप्राचार्या मेघना राजकोटिया यांनी प्रास्ताविक सादर करून विद्यार्थ्यांना कार्यक्रमाविषयी माहिती दिली. आजच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना अजाणतेपणातून घडणाऱ्या चुका आणि त्यांचे परिणाम तसेच त्यासाठी कायद्यानुसार होणारी कारवाई यासाठीची माहिती घेणे किती आवश्यक आहे याबद्दल स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी माहिती दिली.
तर उपस्थित मान्यवरांनी प्रसंगानुसार आणि गांभीर्यानुसार एखाद्या चुकीच्या कार्याबद्दल विद्यार्थी दशेत बालकांना न्यायव्यवस्थेत काय तरतूद केलेली आहे याची अचूकपणे माहिती दिली. तसेच ज्याप्रमाणे आपण आपल्या हक्काची बाजू मांडतो त्यासोबतच आपली कर्तव्य कोण कोणती आहेत. याची देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली. या विधी शिबिरातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील उज्वल भवितव्यासाठी कशा प्रकारचा मार्ग निवडावा याची नक्कीच माहिती मिळाली. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षक तर कर्मचाऱ्यांनी सहाय्य केले.