आरोग्यजळगावशैक्षणिक

ऐनपूरच्या स्वामी अकॅडमी शाळेत संवाद चर्चासत्र

रावेर, (प्रतिनिधी) : ऐनपूर येथील स्वामी अकॅडमी शाळेत बुधवारी विद्यार्थीनींसाठी मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने समुपदेशन व संवाद चर्चासत्र झाले. हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक मनु अँटोनी यांच्या संकलपनेतून व त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला.

या कार्यक्रमात सुरुवातीला पल्लवी महाजन यांनी प्रास्ताविकाद्वारे मुलींना समुपदेशनाची आवश्यकता का व उद्दिष्टे स्पष्ट करून सांगितले. तसेच रुपाली महाजन यांनी मुलींच्या वाढत्या वयाबाबत मुलींना वागणुकीचे नियम, शारीरिक चांगले व वाईट स्पर्श ज्ञान, मनातील न्यूनगंड, नैराश्य, दबाव, स्व-संरक्षण आदी मुद्यांद्वारे मुलींशी संवाद साधला.

या कार्यक्रमात पल्लवी महाजन, रुपाली महाजन व नेहा पाटील यांच्या सोबत समृद्धी वासुदेव महाजन व स्वरा महाजन या विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिक करून अभिनय सादर केला. आभार नेहा पाटील यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button