
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाते जागतिक आहार तज्ञ डॉ. झिशान अली यांनी दिल्या टीप्स
जळगाव (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे इंडीयन सोसायटी ऑफ लाईफ स्टाईल मेडीसीन आयएसएलएम आणि फीजीशियन कमेटी और फॉर रिस्पॉसीबल मेडीसीन यांच्या सयुक्त विद्यमाने एम .बी.बी. एस च्या विदयार्थ्यासाठी असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि उपचारामध्ये पोषणाची भुमिका या विषयावर जागतिकस्तरावरचे आहारतज्ञ डॉ. झिशान अली, वाशिंटन, अमेरिका यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना महत्वपूर्ण टीप्स दिल्या.
सुरूवातीला मान्यवरांचे स्वागत अधिष्टाता डॉ. प्रशांत सोलुंके, डॉ.एन एस आर्विकर, डॉ. दिलीप ढेकळे यांनी शाल, श्रीफळ देऊन केले. मार्गदर्शन करतांना तज्ञांनी जुनाट व संसर्गजन्य नसलेला आजार जसे शुगर, उच्च रक्तदाब, कर्करोग आदीवर पूर्ण शाकाहार हा रामबाण उपाय आहे. तसेच जेवणात तेल, साखर, दुधजन्य पदार्थ, प्राण्यापासून निर्मत कोणतेही पदार्थ न घेतल्यास आरोग्य उत्तम राहील. कृत्रिम रित्या तयार केलेली पदार्थ (जंकफुड), तळलेले पदार्थ इत्यादीचा वापर पूर्णपणे बंद करावा. आपल्या जीवनशैलीत आमुलाग्र बदल करून दारू, तंबाखू, स्निग्ध पदार्थ सेवन टाळावे. व संपूर्ण वनस्पतीजन्य पदार्थांचेच सेवन करावे.या जिवनशैलीमुळे आपणास संसर्गजन्य नसलेले कर्करोग, उच्चरक्तदाब,मधुमेह आणि हदयविकार इ. पासुन आपले संरक्षण होईल.
आहारतज्ञ डॉ. योगीता बावसकर आणि इंडीयन सोसायटी ऑफ लाईफ स्टाईलचे सदस्य डॉ. नितिन नांदुुरकर यांचे सुद्धा संपूर्ण वनस्पती जन्य (डब्ल्युपीबीडी) पदार्थाच्या सेवनाचे फायदे विषद केले. व्याखानास डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविदद्यालयाचे प्राध्यापक, पदव्युत्तर व एम.बी.बी.एस चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर इंडीयन सोसायटी ऑफ लाईफस्टाईल मेडीसील (आयएसएलएम्) च्या वतीने संपूर्ण वनस्पतीजन्य पदार्थापासून बनविलेले पदार्थ भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यशस्वीतेसाठी सहा. प्रा. विजय मोरे, डॉ.गिरिश उगले आणि डॉ. गोविंद पाटील यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन व आभार सुरकान सिध्दकी यांनी मानले.