शैक्षणिकजळगावताज्या बातम्याशालेय

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

रावेर (प्रतिनिधी): आज दि. 28 फेब्रुवारी रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संस्थाचालक मा. श्री रविंद्र राजाराम पवार, सचिव सौ. मनीषा रविंद्र पवार, मुख्याध्यापक श्री राजू पवार सर तसेच पर्यवेक्षिका सौ. कीर्ती निळे मॅडम उपस्थित होते.

विज्ञान दिनाच्या निमित्ताने शाळेत भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटी, जलशुद्धीकरण, सौरऊर्जा व तिचा वापर, जागतिक तापमानवाढ, प्रकाशसंश्लेषण, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर आधारित विविध वैज्ञानिक मॉडेल्स सादर केली.

सादर करण्यात आलेली मॉडेल्स आकर्षक असून भविष्यातील मानवी जीवन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यांचा विचार करून तयार करण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक विचारशक्तीचे कौतुक केले तसेच त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.

या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेतील वातावरण विज्ञानमय झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button