
सेटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत शपथविधी कार्यक्रम उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) : के सी ई मुळजी जेठा महाविद्यालयात २०२५-२६ साठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र करियर संसदेची स्थापना करण्यात आलेली होती. त्या अंतर्गत 14 दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्या नंतर १५ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित उपक्रम करिअर कट्टा या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयामध्ये विद्यार्थी करिअर संसद स्थापना आणि शपथविधी कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख जळगाव जिल्ह्यातील उद्योजक अरुण बोरोले आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य स. ना. भारंबे होते. तसेच करिअर कट्टा समन्वयक डॉ.राजीव पवार, डॉ. मनोज महाजन, वाणिज्य विद्या शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सुरेखा पालवे, डॉ. राम बुधवंत उपस्थित होते.
करिअर संसद सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत
या विद्यार्थी करिअर संसद मधे विविध पदांवर पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात येते. यावर्षी एकूण 20 विद्यार्थ्यांची करिअर संसद महाविद्यालयात स्थापन करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री निलम पाटील, नियोजन मंत्री राहुल महाजन, कायदे आणि शिस्तपालन मंत्री रुचिता सोनगिरे, सामान्य प्रशासन मंत्री वैष्णवी पाटील, माहिती व प्रसारण मंत्री भुषण वारे, उद्योजकता विकास मंत्री शुभम चव्हाण, रोजगार स्वयंरोजगार मंत्री मानसी पाटील, कौशल्य विकास मंत्री प्रणिता शिंपी, संसदीय कामकाज मंत्री वर्षा पाटील, महिला व बालकल्याण मंत्री सपना तायडे, सदस्य साक्षी सिंग, प्रसन्ना कुलकर्णी, अस्मिता चौधरी, सानिका गुंजाळ, धनश्री शिंपी, कावेरी पाटील, गोपाळ मोरे, अनिकेत राठोड, नेहा मराठे, निखील सोनवने यांची निवड करण्यात आली. सर्वांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, करिअरची डायरी आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले आणि सर्वांचा शपथविधी थाटात झाला.