
रावेर, (प्रतिनिधी) : येथील स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साह सोहळा मोठ्या साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे चरणस्पर्श करून कृतज्ञता व्यक्त केली. या भावस्पर्शी क्षणाने उपस्थितांचे मन भारावून गेले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेले गुरु शिष्य परंपरेवर आधारित नाट्यप्रयोग होते, ज्यामध्ये द्रोणाचार्य आणि एकलव्याची कथा साकारत विद्यार्थ्यांनी गुरुभक्तीचे अजरामर उदाहरण सादर केले. या नाट्यप्रयोगात द्रोणाचार्य – स्वरूप कासार, एकलव्य – सुहानी महाजन यांनी वेशभूषा धारण केली होती. तसेच जिन्ना टी.एम., किंजल पाटील, सोनम तडवी, सिद्धेश्वरी पाटील, मोनीष्का चौधरी, जास्मिन चंदलवार, विवेक पाटील, विपुल सोलुंके, वेदांत पाटील, जय विंचुरकर, रुद्र बिरपन या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली
सूत्रसंचालन आनंदी महाजन व कनक कोतवाणी यांनी केले. तर पृथ्वी पाटील हिने गुरुपौर्णिमा भाषण देत गुरुंच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले. गुरुवंदना सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्नेह, आदर आणि भक्तीने सजलेली नृत्य-सादरीकरणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यात एंजल मुळे, अर्णिका पाटील, आराध्या सांगळे, समीक्षा सांगळे, प्रणल असतकर, भाविका चौधरी, तनुष्का पाटील, वैष्णवी महाजन, आरुषी पाटील, निधी चौधरी, नेहा पवार, आराध्या पाटील, गनिका चेजारा या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
यांची होती उपस्थिती
शिक्षक समीर खराले, मंगेश महाजन, वंदना महाजन व गौरांगीनी कासार यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या सभागृहात सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून अध्यात्मिक ओम शांती केंद्राचे प्रमुख डॉ. विजय पाटील, संस्था सचिव मनीषा पवार, संस्थेच्या संचालिका डॉ. सुखदा पवार, संस्थेचे संचालक पुष्पक पवार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजू पवार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हिरकणी धांडे, माध्यमिक विभागाच्या परिवेक्षिका कीर्ती निळे, इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक डॉ. रतिश मौन आणि अनिता पाटील, शिरिष मैराळे उपस्थित होते.
मान्यवरांनी केले मार्गदर्शन
प्रमुख पाहुण्यांनी ओंकार घेऊन कार्यक्रमास शुभारंभ केला. डॉ. विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना अध्यात्म आणि मूल्यशिक्षणाची सांगड घालण्याचे महत्त्व पटवून दिले. मनीषा पवार व राजू पवार यांनी सुद्धा आपल्या प्रभावी शब्दांनी मार्गदर्शन केले. आभार अनिता पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनिता पाटील व रतिश मौन यांनी सहकार्य केले.