सावदा नगरपरिषद; महिलांसाठी १० पेक्षा अधिक जागा राखीव

सावदा (प्रतिनिधी) : सावदा नगरपरिषदच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी सावदा नगरपरिषद सभागृहात प्रभागनिहाय आरक्षण सोडत उत्साही वातावरणात पार पडली. या आरक्षण प्रक्रियेमुळे नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून, विशेषतः महिलांसाठी आरक्षित जागांच्या वाढीमुळे महिला सहभाग वाढण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रभाग निहाय आरक्षण असे
- प्रभाग क्रमांक १ – १ अ अनुसूचित जमातीसाठी आणि १ ब ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव
- प्रभाग क्रमांक २ – २ अ ना.मा.प्र.साठी, तर २ ब सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी
- प्रभाग क्रमांक ३ – अनुसूचित जातीसाठी जागा ३ अ राखीव असून ३ ब सर्वसाधारण (महिला) साठी निश्चित
- प्रभाग क्रमांक ४ – ४ अ ना.मा.प्र.साठी तर ४ ब सर्वसाधारण महिलांसाठी
- प्रभाग क्रमांक ५ मध्ये ५ – अ ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी असून ५ ब सर्वसाधारण (उघड प्रवर्ग) साठी खुली
- प्रभाग क्रमांक ६ आणि ७ – अनुक्रमे ६ अ आणि ७ अ या जागा ना.मा.प्र. (महिला) प्रवर्गासाठी राखीव असून उर्वरित ६ ब आणि ७ ब जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या
- प्रभाग क्रमांक ८ – अनुसूचित जाती (महिला) साठी ८ अ जागा राखीव असून ८ ब सर्वसाधारण
- प्रभाग क्रमांक ९ – ९ अ सर्वसाधारण (महिला) साठी असून, ९ ब सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे.
- प्रभाग क्रमांक १० – १० अ ना.मा.प्र.साठी राखीव असून, १० ब सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली
या आरक्षण प्रक्रियेत महिलांसाठी एकूण १० पेक्षा अधिक जागा राखीव झाल्याचे दिसून येते, जे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे आगामी निवडणुकीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण सोडत प्रक्रिया नगरपरिषद प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडली असून, त्यात कोणताही गोंधळ न होता नियमानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले.




