छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही प्रेरणादायी

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र, कर्तृत्व आणि स्वराज्यनिर्मितीचा विचार आजही समाजाला दिशा देणारा ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतून हिंदवी स्वराज्याची उभारणी करणारे शिवराय हे केवळ इतिहासातील राजे नसून राष्ट्रनिर्माते म्हणून ओळखले जातात.

शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. त्या काळात देशात अराजकता, अन्याय व अत्याचार वाढले होते. यादव, विजयनगर व बहमनी सत्तांचा ऱ्हास झाल्यानंतर विविध सत्ताधीशांकडून कारभार स्थानिक वतनदारांच्या माध्यमातून चालविला जात होता. याचा फटका सामान्य रयतेला सहन करावा लागत होता.

अशा परिस्थितीत संतपरंपरेच्या माध्यमातून समाजात प्रबोधन घडत होते. वारकरी संप्रदायाने कीर्तन, अभंगांच्या माध्यमातून जनजागृती केली. याच पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊंच्या संस्कारातून शिवाजी महाराज घडले.

बालपणापासूनच शिवरायांना शास्त्र, शस्त्रविद्या, नीती, धर्म आणि युद्धकौशल्याचे शिक्षण देण्यात आले. शहाजीराजांच्या मार्गदर्शनामुळे आणि जिजाऊंच्या प्रेरणेमुळे शिवरायांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.

अन्यायाविरुद्ध उभे राहत शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेच्या हितासाठी न्यायव्यवस्था, प्रशासन आणि संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यात आली. ६ जून १६७४ रोजी रायगडावर झालेला राज्याभिषेक हा स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा प्रतीक ठरला.

आजच्या लोकशाही व्यवस्थेतही शिवरायांचे प्रशासन, न्यायनिष्ठा आणि रयतेकेंद्रित धोरणे प्रेरणादायी असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजही समाजात मार्गदर्शक ठरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button