आयोजनजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
अन्नत्याग उपोषणाचा नववा दिवस; १६ फेब्रुवारीपासून जलत्याग उपोषणाचा इशारा

जळगाव (प्रतिनिधी): प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेले अन्नत्याग उपोषण आज नवव्या दिवशीही सुरू असून, प्रशासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी १६ फेब्रुवारीपासून जलत्याग उपोषणास सुरुवात करण्याचा इशारा दिला आहे.
संबंधित मागण्यांसंदर्भात वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने सादर करण्यात आली; मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उपोषण काळात कोणतीही अनुचित परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे.




