जळगावकरांना दिलासा! महादेव हॉस्पिटलमध्ये आता कॅशलेस उपचार सुविधा सुरू

जळगाव (प्रतिनिधी): आरोग्याच्या आणीबाणीच्या प्रसंगी पैशांची तडजोड करणे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नेहमीच मोठे आव्हान ठरते. मात्र आता जळगावकरांना याबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. शहरातील अग्रगण्य महादेव हॉस्पिटलने सर्व प्रमुख विमा कंपन्यांसोबत संलग्न होऊन कॅशलेस उपचार सुविधा सुरू केली आहे. यामुळे रुग्णांना खिशातून एकही रुपया न घालता जागतिक दर्जाचे उपचार घेता येणार आहेत.
उपचार आता चिंतामुक्त
अचानक आरोग्याच्या समस्या उद्भवल्या तरी आर्थिक ताण टाळण्यासाठी महादेव हॉस्पिटलने ‘चिंतामुक्त उपचार, निरोगी जीवनाकडे एक पाऊल’ हे ब्रीदवाक्य घेऊन ही सुविधा राबवली आहे. हॉस्पिटलमध्ये कोणत्याही नामांकित विमा कंपनीची पॉलिसी असल्यास रुग्ण विनाविलंब आणि विनाखर्च उपचारासाठी सुविधा घेऊ शकतात.
एकाच छताखाली सुपर स्पेशालिटी सेवा
महादेव हॉस्पिटलमध्ये केवळ कॅशलेस सुविधा नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध महत्त्वाच्या विभागांत उपचार उपलब्ध आहेत. यात:
न्यूरॉलॉजी व न्यूरोसर्जरी विभाग – मेंदू व मणक्याचे सर्व विकार
कार्डिओलॉजी विभाग – हृदयरोग संबंधित उपचार
युरॉलॉजी विभाग – मूत्रविकार संबंधित उपचार
नेफ्रॉलॉजी विभाग – किडनी विकार व डायलिसिस
सर्व प्रमुख विमा कंपन्यांशी संलग्नता
हॉस्पिटलने स्टार हेल्थ, टाटा AIG, SBI इन्शुरन्स, ओरिएंटल, न्यू इंडिया, ICICI प्रुडेन्शियल, बजाज आलियान्झ, केअर हेल्थ, मेडी असिस्ट, अकॉ, आदित्य बिर्ला, HDFC लाईफ, लिबर्टी जनरल, पॅरामाउंट हेल्थ अशा सर्व प्रमुख कंपन्यांसोबत करार केले आहेत.
जळगावच्या मध्यवर्ती ठिकाणी, आकाशवाणी चौक, राष्ट्रीय महामार्गावर हे हॉस्पिटल कार्यरत आहे. अधिक माहितीसाठी किंवा आपत्कालीन स्थितीत ९३२५१५०००४, ९११२०२००५५, ९११२०३००५५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
“रुग्णांना वेळेवर आणि पैशांच्या अडचणीशिवाय उत्तम आरोग्य सेवा मिळावी, हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे,” – रुग्णालय प्रशासन, महादेव हॉस्पिटल, जळगाव.




