शैक्षणिकजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशालेय

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा

जळगाव (प्रतिनिधी): भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय अर्थसंकल्प २०२६ वर युवक-युवतींसाठी परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

या परिचर्चेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कृषी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, तंत्रज्ञान तसेच युवक कल्याण क्षेत्रांतील अर्थसंकल्पीय तरतुदींवर आपली मते मांडली. येत्या काळात युवकांच्या सर्जनशीलतेस चालना देण्यासाठी २ हजार क्रिएटर्स लॅब तसेच मानसिक आरोग्यासाठी राष्ट्रीय मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट स्थापन करण्याच्या तरतुदींना युवकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

चर्चेदरम्यान राष्ट्रीय अर्थसंकल्प युवक-केंद्रित असून विकसित भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणारा असल्याचा सूर व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. आर. बी. देशमुख यांनी सहकार्य केले, तर स्वयंसेवक कमलेश सोनवणे व चेतन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

जळगाव (
भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय अर्थसंकल्प २०२६ वर युवक-युवतींसाठी परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

या परिचर्चेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कृषी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, तंत्रज्ञान तसेच युवक कल्याण क्षेत्रांतील अर्थसंकल्पीय तरतुदींवर आपली मते मांडली. येत्या काळात युवकांच्या सर्जनशीलतेस चालना देण्यासाठी २ हजार क्रिएटर्स लॅब तसेच मानसिक आरोग्यासाठी राष्ट्रीय मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट स्थापन करण्याच्या तरतुदींना युवकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

चर्चेदरम्यान राष्ट्रीय अर्थसंकल्प युवक-केंद्रित असून विकसित भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणारा असल्याचा सूर व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. आर. बी. देशमुख यांनी सहकार्य केले, तर स्वयंसेवक कमलेश सोनवणे व चेतन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button