स्वामी विवेकानंद विद्यामंदिराच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश

रावेर (प्रतिनिधी): दि. ७ फेब्रुवारी २०२६ – मेरा युवा भारत जळगाव संचलित सिद्धी फाउंडेशन यांच्या वतीने १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन सरदार जी.जी. हायस्कूल, रावेर येथे करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, १०० मीटर धावणे तसेच गोळाफेक या स्पर्धांचा समावेश होता.
या स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर येथील खेळाडूंनी उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला, तर मुलींच्या खो-खो संघाने द्वितीय क्रमांक पटकावून स्वामी स्पोर्ट्स क्लबचा विजयाचा परंपरा कायम ठेवली.
वैयक्तिक स्पर्धांमध्ये १०० मीटर धावण्यामध्ये अनिकेत रेहमान तडवी याने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच मुलींच्या गटात पूर्वी सुरेश चौधरी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. गोळाफेक स्पर्धेत शुभम विजय महाजन याने तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला.
या यशाबद्दल स्वामी स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंचे स्वामी परिवाराचे अध्यक्ष- रवींद्र राजाराम पवार, सचिव- मनिषा रवींद्र पवार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजू पवार, मुख्याध्यापिका हिरकणी धांडे, पर्यवेक्षिका कीर्ती निळे, क्रीडाशिक्षक- विष्णू चारण तसेच मंगेश महाजन, सपकाळे, शिरीष मैराळे व स्वामी स्पोर्ट्स क्लबचे आजी-माजी खेळाडू यांनी कौतुक केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.




