
जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये “वन महोत्सव सप्ताह” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमीत्ताने पर्यावरणाचे संरक्षण आणि वृक्षारोपणाचे महत्त्व रुजवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताहात विद्यार्थ्यांनी “गो ग्रीन” या संकल्पनेवर आधारित नाटिका तसेच साँफ्टबोर्ड डेकोरेन स्पर्धा आयोजित करण्यात आली. ज्यात वनमोहत्सव, निसर्गाचे महत्त्व, जंगलतोडीचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणाचे संदेश प्रभावीपणे दिले गेले. यावेळी औद्योगिक वसाहतीत विविध ठीकाणी वृक्षारोपण उपक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शाळेच्या प्राचार्य नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात शाळेच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावून “एक विद्यार्थी — एक वृक्ष” ही संकल्पना यशस्वी करण्यात आली. सोशियल सायन्स क्लबच्या प्रमुख चंद्रकला सोनवणी व टीमतर्फे घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कारही करण्यात आला.