जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशालेयशैक्षणिक

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘आत्मविश्वास विकास अभियान’ उपक्रमाचा शुभारंभ

जळगाव (प्रतिनिधी) : संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आत्मविश्वास विकास अभियान’ या विशेष उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या अभियानाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच व न्यूनगंड दूर करून त्यांच्यात सकारात्मक विचारसरणी व आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास ही सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी विशेष गुण असतात, फक्त त्यांना योग्य दिशा व प्रोत्साहनाची गरज असते.” या अभियानांतर्गत दररोज प्रेरणादायी विचार, आठवड्याला वक्तृत्व व वाचन सराव, लघु स्पर्धा, कौतुक योजना तसेच वैयक्तिक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

“आठवड्याचा आत्मविश्वासी विद्यार्थी” या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शाळेतील शिक्षकवृंदही सक्रिय सहभाग घेत आहेत. या अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button